

CJI Surya Kant
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच न्यायालयाच्या कामकाजपद्धतीत मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विशेषतः केस मेंशनिंग (उल्लेख) प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणले जाणार असल्याचे त्यांनी वकिलांना सांगितले. १ डिसेंबरपासून सुधारणांचा पहिला टप्पा लागू होईल, असे त्यांनी न्यायालयात बोलताना नमूद केले.