

CJI Suryakant
esakal
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मध्यस्थीला कायद्याचे सर्वात प्रगत स्वरूप म्हटले आहे. ते म्हणाले की, खटला हा बहुतांशी तुटलेल्या नातेसंबंधांचे पोस्टमार्टम असतो, तर मध्यस्थी ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असते. गोव्यात बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या मध्यस्थीवरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.