

CJI Surya kant
Esakal
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशात राष्ट्रीय न्यायिक धोरण आणण्याची गरज अधोरेखित केली. यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील उच्च न्यायालयांच्या निर्णयांमध्ये सुसंगतता व एकरूपता येईल, असा त्यांचा आग्रह आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित संविधान दिन समारंभात ते बोलत होते.