कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Shortest CJP Protester दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनातला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. कमी उंचीच्या आंदोलकाला पकडल्यानंतर जवानाने त्याला कडेवर उचलून घेतलं आणि पोलिसांकडे सोपवलं.
Shortest CJP Protester

Shortest CJP Protester

Esakal

Updated on: 

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनात पोलिसांनी ७ हजारहून अधिक आंदोलकांना शनिवारी ताब्यात घेतलं. या आंदोलकांना रात्री उशिरा सोडण्यात आलं. तर रविवारी सकाळी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेसह इतरांचीही सुटका करण्यात आली. दरम्यान, आंदोलनातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात कमी उंचीच्या एका आंदोलकाचा जवानाने पाठलाग केल्याचं आणि त्याला पकडल्याचा व्हिडीओ चर्चेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com