

CJP protest
esakal
Massive Public Participation in Delhi CJP Protest : 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी सांगितले की, परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधातील त्यांचे आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत सुरूच राहील. दीपके यांनी नमूद केले की, शनिवारी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेले आंदोलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले आणि त्यात सुमारे ७,००० लोकांनी सहभाग घेतला. त्यांनी पुढे सांगितले की, आता हे आंदोलनांचा देशभर विस्तार होईल.