

Ashutosh Ranka on CJP’s Absence From Opposition Protest
esakal
Delhi Protest Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर राहुल गांधी यांनीही आपल्या मागण्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, या मोर्चात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चा एकही सदस्य सहभागी झालेला दिसला नाही. विशेष म्हणजे, मोर्चापूर्वी CJP ने विरोधकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.