

CJP’s Saurav Das, Ashutosh Ranka Released from Jail After Seven Days
esakal
New Delhi: जंतरमंतर येथे आंदोलन केल्याप्रकरणी सात दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते सौरव दास आणि आशुतोष रंका यांची सुटका करण्याचे आज आदेश न्यायालयाने दिले. दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.