प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षपदी प्रसाद यांची दुसऱ्यांदा निवड

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. के. प्रसाद यांची दुसऱ्यांदा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2014 पासून प्रसाद यांनी तीन वर्षे मीडिया वॉचडॉगचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या जागी प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली -  सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. के. प्रसाद यांची दुसऱ्यांदा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2014 पासून प्रसाद यांनी तीन वर्षे मीडिया वॉचडॉगचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या जागी प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सी. के. प्रसाद यांची पुनर्निवडीची घोषणा करीत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 22 मे रोजी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे. आज हे पत्रक प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या समितीने प्रसाद यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा नियुक्ती केली आहे. 

Web Title: c.k. Prasad's second term as president of the Press Council