Jodhpur Violence | जोधपूर: ईदच्या पूर्वसंध्येला दोन समुदायात दगडफेक; इंटरनेट सेवा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jodhpur Violence
जोधपूर: ईदच्या पूर्वसंध्येला दोन समुदायात दगडफेक; इंटरनेट सेवा बंद

जोधपूर: ईदच्या पूर्वसंध्येला दोन समुदायात दगडफेक; इंटरनेट सेवा बंद

राजस्थानातल्या जोधपूर इथं काल रात्री दोन समुदायांमध्ये वाद उफाळून आला. यामध्ये दगडफेक झाल्याने काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

राजस्थानमधल्या जोधपूर(Jodhpur Violnece) जिल्ह्यातल्या जलोरी गेट परिसरात सोमवारी रात्री उशीरा दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. स्वातंत्र्य सैनिकाच्या पुतळ्यावर झेंडा फडकवण्यावरून दोन गटांमध्ये हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परशुराम जयंती(Parshuram Jayanti) आणि ईद(Eid) दोन्ही एकाच दिवशी आहेत. या दिवशी कोणता झेंडा लावायचा यावरून या दोन गटांमध्ये हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जिथे नमाझ पठण केलं जातं, त्या परिसरात परशुराम जयंतीनिमित्त झेंडे लावण्यात आले होते. त्यानंतर ईदनिमित्ताने मुस्लीम समाजााला झेंडे लावायचे होते. त्यामुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ईदगाहच्या जवळील परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही गटांतला तणाव वाढला आणि दगडफेक सुरू झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून जोधपूरमधली इंटरनेट सेवा पोलिसांनी बंद केली आहे.

Web Title: Clashes Between 2 Communities Before Eid In Jodhpur Internet Suspended

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jodhpur
go to top