
पुलवामामध्ये दहशतवादी, सुरक्षा दलांमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार
पुलवामाच्या पहू भागात रविवारी (ता. २४) दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करून सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. (Clashes between militants and security forces in Pulwama and Two terrorists killed)
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पहू भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी केली आणि शोध मोहीम सुरू केली, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल चकमक सुरू झाली. यात तीन दहशतवाद्यांचा (terrorist) मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर असताना सुरक्षा दलांना हे यश मिळाले. तीन दिवसांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी झालेली ही चौथी चकमक आहे.
याआधी जम्मूच्या सुजवान भागात झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर (Jammu and kashmir) पोलिस आणि निमलष्करी दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे दहशतवादी मोठा दहशतवादी कट रचण्यासाठी आले होते. दोन्ही आत्मघातकी हल्लेखोरांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
Web Title: Clashes Between Militants And Security Forces In Pulwama Two Terrorists Killed Jammu And Kashmir Nad86
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..