
सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार, उर्वरितांचा शोध सुरू
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक सुरू आहे. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या पथकाने दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. गोळीबारात लष्कराचा जवान जखमी झाला आहे. तर एक दहशतवादी ठार झाला आहे. उर्वरितांचा शोध सुरू आहे. लष्कराकडून कारवाई सुरू असून दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. Clashes between security forces and Terrorist in Pulwama)
प्राप्त माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मित्रीगाम भागात दहशतवादी (Terrorist) लपल्याची माहिती मिळाली होती. पुलवामा पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफ जवानांच्या मदतीने परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.
दरम्यान, एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरुवातीला सुरक्षा दलांनी (security forces) दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, दहशतवाद्यांनी दुर्लक्ष करीत सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.
हेही वाचा: राहुल गांधींच्या उदासीनतेने बिघडले काम! PK गोटातून नवी माहिती
सुमारे दोन ते तीन दहशतवाद्यांना (Terrorist) घेरण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरातून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. परिसराची नाकाबंदी केली आहे. ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. जेणेकरून किती दहशतवादी आहेत आणि त्यांच्याकडे कोणती शस्त्रे आहेत, याची माहिती मिळेल. आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला असून, उर्वरितांचा शोध सुरू आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानात बसलेले हस्तक काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगसाठी उर्वरित दहशतवादी आणि साथीदारांवर दबाव आणत आहेत. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याच्या सरकारच्या योजना हाणून पाडाव्यात म्हणून हे केले जात आहे. मात्र, काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये स्थायिक केले जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी व्यापक रणनीती तयार करण्यात येत आहे. १० दिवसांपूर्वी पट्टणमधील गोशबुग भागात दहशतवाद्यांनी सरपंच मंजूर अहमद बंगरू यांची हत्या केली होती.
Web Title: Clashes Between Security Forces And Terrorist In Pulwama
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..