७ दिवसांत ११ दहशतवादी ठार; सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक| jammu kashmir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jammu

७ दिवसांत ११ दहशतवादी ठार; सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक

दक्षिण काश्मीरमधील (jammu kashmir) कुलगाम जिल्ह्यातील (Kulgam district) हसनपोरा भागात रविवारी दुपारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक (Clashes between security forces and terrorists) झाली. या भागात किती दहशतवादी अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. शुक्रवारी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत रात्रभर चाललेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले होते. त्यामुळे सात दिवसांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या ११ झाली आहे.

बडगाममधील जोलवा क्रालपोरा चदूरा येथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई सुरू केली. श्रीनगरमधील नौगाम येथील वसीम मीर असे एका दहशतवाद्याचे नाव आहे. प्राथमिक तपास आणि जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे इतर दोन दहशतवादी हे परदेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची खरी ओळख तपासली जात आहे. पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, घटनास्थळावरून तीन एके-५६ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jammu And Kashmir
loading image
go to top