Board Exams : पाचवी ते अकरावी बोर्डाच्या परीक्षा रद्द

कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश
Board Exams
Board Examsesakal

बंगळूर : कर्नाटक राज्याचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये पाचवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या वर्गांसाठी राज्यस्तरीय बोर्ड परीक्षा घेण्याचे राज्य सरकारने जारी केलेले परिपत्रक उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे या वर्गांच्या बोर्ड परीक्षा आता होणार नाहीत.

Board Exams
Yoga For Eye Health : डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या योग्य पद्धत

राज्य सरकारने यापूर्वी राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमधील इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील मूल्यांकनाऐवजी राज्यस्तरीय बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

उच्च न्यायालयाचे न्या. रवी होसमनी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. शिक्षण विभागाचे परिपत्रक सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना लागू होते. हा अभ्यासक्रमाचा भाग नाही, असे म्हटले होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com