"लेस्बियन' संबंधांच्या दबावामुळे मुलीची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मृत विद्यार्थिनीच्या कुटूंबीयांनी तिला त्रास दिला जात असल्याची तक्रार विद्यालय व्यवस्थापनाकडे याआधी करण्यात आल्याचे म्हटले आहे. ही तक्रार करण्यात आल्यानंतरच मृत विद्यार्थिनी तिच्या बहिणीसमवेत राहण्यासाठी आल्याचे कुटूंबीयांनी म्हटले आहे

चंडीगड - कर्नाळ येथील एका निवासी विद्यालयामध्ये 11 वीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त आज (सोमवार) सूत्रांनी दिले.

या विद्यार्थिनीवर विद्यालयामधील इतर दोन विद्यार्थिनींनी समलैंगिक संबंधांसाठी दबाव आणल्याने तिने आत्महत्या केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या प्रकरणी मृत विद्यार्थिनीवर दबाव आणणाऱ्या दोन बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या विद्यार्थिनीने विद्यालयाच्या वसतिगृहामधील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत विद्यार्थिनी ही पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तिच्या बहिणीसमवेत या खोलीमध्ये रहात होती. आरोपी विद्यार्थिनी याही अनुक्रमे अकरावी व पदवी वर्षाच्या द्वितीय वर्षामध्ये शिकत आहेत.

दरम्यान, आरोपी विद्यार्थिनींविरोधात कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याचा दावा विद्यालय प्रशासनाने केला आहे. मात्र मृत विद्यार्थिनीच्या कुटूंबीयांनी तिला त्रास दिला जात असल्याची तक्रार विद्यालय व्यवस्थापनाकडे याआधी करण्यात आल्याचे म्हटले आहे. ही तक्रार करण्यात आल्यानंतरच मृत विद्यार्थिनी तिच्या बहिणीसमवेत राहण्यासाठी आल्याचे कुटूंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

Web Title: Class XI girl kills self

टॅग्स