CLAT 2021 : सामाईक विधी प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

23 जुलैला होणार ऑफलाइन परीक्षा
Law Exam
Law ExamGoogle

नवी दिल्ली : सामाईक विधी प्रवेश परीक्षा (CLAT 2021) येत्या २३ जुलै रोजी ऑफलाइन स्वरुपात होणार आहे. संपूर्ण कोरोना प्रोटोकॉल्सची काळजी घेत पेन आणि पेपरचा वापर करुन निश्चित परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठांच्या संघानं याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. (CLAT 2021 will be held on 23rd July Via Offline Mode)

या अधिसूचनेतून LL.M. अभ्यासक्रमाच्या उमेदवारांना परीक्षेचं स्वरुपाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेत १२० बहुपर्यायी प्रश्न असतील या प्रश्नांची उत्तर १२० मिनिटांमध्ये द्यावी लागणार आहेत. या परीक्षेसाठी डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांचा सेक्शन असणार नाही, असं राष्ट्रीय विधी विद्यापीठांच्या संघानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, २९ एप्रिल रोजी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नोंदणीची शेवटची तारीख १५ मे पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर १५ मे रोजी होणारी परीक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. ज्याची तारीख आज जाहीर करण्यात आली.

Law Exam
गुंतवणुकदारांची खाती गोठवल्याच्या चर्चा खोट्या - अदानी ग्रुप

सुरुवातीला CLAT परीक्षा १३ जून २०२१ रोजी होणार होती. पण ही तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता नवी तारीख निश्चित करण्यात आली. तसेच नोंदणीची शेवटची तारीख उलटून गेली असली तरीही अर्जदारांना दूर परीक्षेसाठी जाण्याचं टाळण्यासाठी त्यांना जवळच्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठ संघाकडून उमेदवारांनी दिलेल्या पहिल्या दोन पसंती केंद्रांवरच त्यांचा नंबर लागेल याचा प्रयत्न केला जाणार आहे. परीक्षेनंतर उमेदवारांना संघाच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.

परीक्षेला येताना लशीकरण महत्वाचं

दरम्यान, परीक्षेला येताना उमेदवारांनी लशीकरण केलेलं असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रांवर खबरदारीसाठी कोरोनासंबंधीचे प्रोटोकॉल्स लवकरच जाहीर करण्यात येतील असंही राष्ट्रीय विधी विद्यापीठे संघानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com