घराणेशाहीमुळे सामान्यांसाठी राजकारणाची दारे बंद होतायेत : वरूण गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

राजकारणातील घराणेशाहीमुळे सामान्य नागरिकांसाठी राजकारणाचे दारे बंद होत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि निषेधार्ह आहे.

- वरूण गांधी, भाजप खासदार

नवी दिल्ली : राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राजकारणातील घराणेशाहीमुळे सामान्य नागरिकांसाठी राजकारणाचे दारे बंद होत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि निषेधार्ह आहे, असे टीकास्त्र वरूण गांधी यांनी राहुल गांधींवर सोडले. 

'फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स'ने ‘भारताच्या भविष्याचा मार्ग, संधी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानादरम्यान वरूण गांधी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''राजकारणातील घराणेशाहीमुळे सामान्य नागरिकांसाठी राजकारणाचे दरवाजे बंद होत चालले आहेत. आपण असे राजकारण केले पाहिजे. ज्यामुळे सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल. मात्र, प्रत्यक्षात घराणेशाहीला प्राधान्य देणारे राजकारण केले जाते आहे''. 

दरम्यान, राहुल गांधींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज (मंगळवार) विविध स्तरावरून शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र, त्यांचे बंधू वरूण गांधी यांनी राहुल गांधींवर आज टीकास्त्र सोडले.

Web Title: Closing Doors Of Opportunity For Common Man Says BJP MP Varun Gandhi