कोरोनाविरुद्ध हवा कापडी, कागदी पृष्ठभाग

वृत्तसंस्था
Tuesday, 16 February 2021

कोरोना विषाणूविरुद्ध काच किंवा प्लॅस्टिकच्या तुलनेत कागदी किंवा कापडी पृष्ठभाग परिणामकारक ठरतो. तेथे विषाणू तग धरण्याची शक्यता कमी असते, असे संशोधन आयआयटी बॉम्बेच्या संशोधकांनी केले आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूविरुद्ध काच किंवा प्लॅस्टिकच्या तुलनेत कागदी किंवा कापडी पृष्ठभाग परिणामकारक ठरतो. तेथे विषाणू तग धरण्याची शक्यता कमी असते, असे संशोधन आयआयटी बॉम्बेच्या संशोधकांनी केले आहे.

मोदी सरकारची ट्विटरला दणका देण्याची तयारी; KOO अ‍ॅपला मिळणार पसंती

संसर्गग्रस्त व्यक्तीच्या श्वास किंवा शिंकेवाटे बाहेर पडणारे द्रवबिंदू सुद्धा अशा पृष्ठभागावर जास्त काळ तग धरू शकत नाही असेही त्यांना आढळून आले. हा अभ्यास अहवाल फिजिक्स ऑफ फ्लुईड््स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संघमित्रो चटर्जी यांनी अहवाल लिहिला असून संशोधनात जननी क्षी मुरलीधरन, अमित अग्रवाल आणि रजनीश भारद्वाज यांनी भाग घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काच, प्लॅस्टिकसारख्या अभेद्य तसेच कागद, कापडासारख्या छिद्र असलेल्या पृष्ठभागावरील ९९.९ टक्के द्रवबिंदू पहिल्या काही मिनिटांत हवेत विरून जातात, मात्र त्याचे द्रवरूप अंश कायम राहतात. ते केवळ सुक्ष्मदर्शकातून दिसू शकतात, पण त्यावर विषाणू तग धरू शकतो. कागदी पृष्ठभागावरील द्रवबिंदूचा तग धरण्याचा काळ सहा तास असतो. शाळा, महाविद्यालयांच्या संदर्भात ते पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेताना हा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो, असे या संशोधकांना वाटते.

Toolkit Case: खलिस्तानी समर्थकांच्या संपर्कात असलेली निकीता जेकब आहे तरी कोण?

अभ्यास पथकाच्या शिफारशी

  • मानवाने स्पर्श केल्यास संसर्गाचा धोका कमी व्हावा म्हणून रुग्णालये, कार्यालये अशा ठिकाणी काच, स्टील किंवा लाकडी फर्निचरवर कापड टाकण्यात यावे
  • उद्याने, मॉल, हॉटेल, रेल्वे, विमानतळ येतील प्रतिक्षा कक्ष अशा ठिकाणच्या आसनांवरही कापड असावे

पृष्ठभागाचे स्वरूप आणि विषाणू तग धरण्याचा काळ
काच    ४ दिवस
प्लॅस्टिक, स्टील    ७ दिवस 
कागद    ३ तास
कापड    २ दिवस

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cloth paper surface against corona