esakal | हिमाचल प्रदेशात ढगफुटीनं हाहाकार; घरं, गाड्या गेल्या वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : ढगफुटी झाल्यानं येथे मोठा हाहाकार माजला असून अनेक घरं आणि रस्त्यांवरील वाहनं पाण्याच्या प्रचंड वेगामुळे वाहून गेली आहेत.

हिमाचल प्रदेशात ढगफुटीनं हाहाकार; घरं, गाड्या गेल्या वाहून

sakal_logo
By
अमित उजागरे

धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला शहरात ढगफुटी झाली असून त्यामुळे मोठा हाहाकार माजला आहे. येथील मकलोडगंजपासून सुमारे दोन किमी अंतरावरील फागसू येथे सोमवारी सकाळी ढगफुटी झाली. त्यामुळे अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे अनेक घरं आणि हॉटेलांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकचं नव्हे पर्यटक आणि स्थानिक लोकांच्या कारही या पाण्याच्या वेगामध्ये वाहून गेल्या. (cloud burst in Himachal Pradesh parked Car drown and houses damaged)

गेल्याकाही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान, आज सकाळी येथील धर्मशाला भागातील मॅकलिओडगंज जवळ ढगफुटी झाली त्यामुळे येथून वाहणाऱ्या नदीला मोठा पूर आला आणि वेगानं पाणी वाहू लागलं. त्यामुळे भागसू गावातील लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनेतील पाण्याचं रौद्ररुप दाखवणारा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यामुळे रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या गाड्या, कार अक्षरशः वाहून गेल्या आहेत. तसेच अनेक हॉटेलांमध्ये पाणी शिरल्यानं त्यांचंही मोठ नुकसान झालं आहे. इथल्या मांझी नदीच्या काठावर असलेली सुमारे १० दुकानांचं मोठ नुकसान झालं आहे.

राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक

या तीव्र पाण्याच्या लोंढ्यांमुळं शिमला जिल्ह्यातील रामपूर भागातल्या झक्री येथील राष्ट्रीय महामार्ग देखील ब्लॉक झाला आहे. हा रस्ता मोकळा करण्याचं काम संबंधीत अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे.

हेही वाचा: भोसरी जमीन घोटाळा: एकनाथ खडसेच्या जावयाला १५ जुलैपर्यंत ED कोठडी

दोन जण बेपत्ता

दरम्यान, उपायुक्त निपुण जिंदाल यांनी या घटनेबाबत सांगितलं की, "मुसळधार पाऊस आणि पूरामुळं कांगरा जिल्ह्यात दोन जण बेपत्ता झाले आहेत. भागसू नाग येथे ढगफुटी झाली असं म्हणता येणार नाही पण मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळं आलेला भीषण पूर असं म्हणता येईल."

loading image