
Summary
दोडा- किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे ४ जणांचा मृत्यू व १० हून अधिक घरे वाहून गेली.
पूरामुळे बाजारपेठा, घरे आणि रस्त्यांमध्ये पाणी शिरले असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
रामबन भागातील भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील ढगफुटीच्या घटनेने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे १० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कालपासूनच्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बाधित भागात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.