
Political News : बेळगाव पालकमंत्रीपदी गोविंद कारजोळांची वर्णी
बेळगाव: पाठबंधारे मंत्री गोविंद कारजोळ (Govind Karjol) यांची बेळगावच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती आज (ता.२४) करण्यात आली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (B.S.Yediyurappa) पायउतार झाल्यानंतर व नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अतिवृष्टी आणि कोविडस्थिती भीषण होती. या दरम्यान त्यांनी हंगामी पालकमंत्र्यांची घोषणा केलेली होती. आज यासंदर्भात सुधारीत आदेश जारी करत अधिकृत पालकमंत्र्यांची घोषणा केली.
हेही वाचा: ...नाहीतर पेपर फोडायला कसे मिळाले असते? सदाभाऊंचे सरकारवर टीकास्त्र
राज्यातील २८ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गोविंद कारजोळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख आहे. यामुळे पालकमंत्र्यांना बदलणार किंवा बेळगावसाठी नवीन पालकमंत्री घोषित करण्यात येणार आहे, या चर्चेत तथ्य राहिलेले नाही. माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबाबत अश्लिल व्हिडिओ प्रकरण बाहेर पडल्यानंतर पायउतार होण्याची वेळ आली.
मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी कारजोळ यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली. तेव्हापासून तेच बेळगावचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होते. परंतु, मध्यंतरी मुख्यमंत्रीपदी फेरबदल झाल्यानंतर बेळगावसह राज्यातील पालकमंत्र्यांचा विषय रखडला होता. पालकमंत्र्यांची तात्कालिक नियुक्ती करण्यात आली होती. आता अधिकृत घोषणा करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दरम्यान, वनमंत्री उमेश कत्ती यांची विजापूर आणि महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांची विजयनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Web Title: Cm Basavaraj Bommai Announcement Govind Karjol Guardian Minister Of Belgaum Karanataka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..