महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा CM शिंदेंचा निर्धार!

आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
Eknath Shinde
Eknath Shindesakal

पणजी : महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कृषीतज्ज्ञ वसंतराव नाईक यांचा आज जन्मदिवस. हा दिवस कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली, असंही केसरकर यांनी सांगितलं. (CM Eknath Shinde decision to make Maharashtra farmers suicide free)

Eknath Shinde
उदयपूरच्या घटनेला सर्वस्वी नुपूर शर्मा जबाबदार; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!

केसरकर म्हणाले, "जेव्हा एका शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राच्या कृषीमंत्रीपदी बसतो तेव्हा त्यांचे विचार कसे असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. राजकीय लढाई संपल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्राचा जनतेला दिलासा देण्याचं पहिलं पाऊल मुख्यमंत्री शिंदे यांनी टाकलं आहे. आजच्या कृषीदिनी शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना केवळ श्रद्धांजली अर्पण केली नाही तर शपथ घेतली की, हा महाराष्ट्र मी शेतकरी आत्महत्या करुन दाखवेन"

Eknath Shinde
अमरिंदर सिंग उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार? पक्षही करणार भाजपत विलीन

मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्याच्या ग्रामीण भागातून आलेले आहेत. आज महाराष्ट्राच नागरीकरण हे ५१ टक्के झालेलं आहे. परंतू ४९ टक्के लोकं ही ग्रामीण भागात राहतात त्यातील ८० टक्के लोकं आजही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळं असा नेता ज्याला शेतकऱ्याबद्दल कळवळा आहे. ज्याचा जन्म साताऱ्यातील दुष्काळी भागात झाला आहे. असंख्या वारकरी ज्या मार्गावरुन विठ्ठलाच्या ओढीनं मार्गक्रमण करतात अशा भागात त्यांचा जन्म झाला आहे, असंही यावेळी केसरकर म्हणाले.

केवळ कर्जमाफी करुन चालणार नाही

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देताना केवळ कर्जमाफी करुन चालणार नाही. त्यांना मदतीचा हात दिला गेला पाहिजे. त्यांना आधार दिला पाहिजे याचा निर्भार शिंदे यांनी केला आहे. प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेले देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत, असंही दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com