Jharkhand Politics : दिल्लीनंतर झारखंडमध्ये सोमवारी विश्वासदर्शक ठराव, भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Hemant Soren government

मुख्यमंत्री सोरेन यांनी झामुमो, काँग्रेस आणि राजद आमदारांना छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हलविलं आहे.

Jharkhand : दिल्लीनंतर झारखंडमध्ये सोमवारी विश्वासदर्शक ठराव, भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होणार?

Jharkhand Politics News : महाराष्ट्र राज्यानंतर झारखंडमध्ये (Jharkhand) सत्ता काबिज करण्यासाठी भाजपनं ‘ऑपरेशन लोटस’ (BJP Operation Lotus) सुरु केलंय. त्यामुळं मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना आपल्या आमदारांना दुसरीकडं 'शिफ्ट' करावं लागलं आहे. झारखंडच्या राजकारणातील सस्पेन्स कायम असून, मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारनं येत्या सोमवारी विधानसभेचं एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलविलं आहे. त्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.

महागठबंधन आमदारांचं संख्याबळ पाहता सोरेन सरकार हा ठराव जिंकेल. त्यामुळं बिहार, दिल्लीपाठोपाठ झारखंडमध्येही ‘ऑपरेशन लोटस’ फेल होणार हे निश्चित मानलं जातंय. झारखंडमध्ये कथित खाण वाटप लिलावात घोटाळा झाल्याचा भाजपचा (BJP) आरोप आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी लिलावात स्वतःच एक खाण घेतली. हा ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ कायद्याचं उल्लंघन झाल्याचा भाजपचा आरोप आहे.

हेही वाचा: Arvind Kejriwal : भाजप आमदारांच्या गैरहजेरीत केजरीवाल सरकारनं सिध्द केलं 'बहुमत'

सोरेन यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस

या आरोपावर निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री सोरेन यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस राज्यपाल रमेश बैस यांच्याकडं गेल्या आठवड्यात केली. मात्र, राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाहीय. या काळात भाजपकडून झामुमो, काँग्रेस आणि राजदचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तर, मुख्यमंत्री सोरेन यांनी झामुमो, काँग्रेस आणि राजद आमदारांना छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हलविलं आहे. तीन दिवसांपासून हे आमदार रायपूरच्या रिसॉर्टमध्ये आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सोरेन यांनी काल मंत्रीमंडळ बैठक घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याप्रमाणंच विशेष अधिवेशन बोलवून स्वतःच विश्वासदर्शक ठराव मांडायचा निर्णय सोरेन यांनी घेतल्याचं वृत्त आहे.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2022 : मुलाचं नाव ठेवताय? मग, गणपतीच्या नावानं ठेवा 'ही' नावं

Web Title: Cm Hemant Soren Government Will Move A Confidence Motion In Jharkhand Vidhan Bhavan On Monday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JharkhandBjpCongress