Ganesh Chaturthi 2022 : मुलाचं नाव ठेवताय? मग, गणपतीच्या नावानं ठेवा 'ही' नावं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi 2022

कालपासून गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) सुरुवात झालीय.

Ganesh Chaturthi 2022 : मुलाचं नाव ठेवताय? मग, गणपतीच्या नावानं ठेवा 'ही' नावं

Ganesh Chaturthi 2022 : कालपासून गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) सुरुवात झालीय. दरवर्षी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपतीचे भक्त हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या विशेष सणानिमित्त भक्त बाप्पाची पूजा करतात आणि घरोघरीही त्याची प्रतिष्ठापना केली जाते. बाप्पावरील भक्तांचं प्रेम पाहण्यासारखं आहे.

गणेशजी देखील आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. बाप्पाची पूजा केल्यानं सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर आज आम्ही तुम्हाला गणेशजींशी संबंधित अशी काही नावं सांगणार आहोत, ज्याचं पालन केल्यानं तुमच्या मुलाची कधीही वाईट नजर राहणार नाही. तसेच देवाचा आशीर्वाद सदैव राहील.

भालचंद्र - भालचंद्र नावाची मुलं साहसी आणि नवीन गोष्टी करण्यासाठी आणि शिकण्यासाठी नेहमीच तयार असतात. भालचंद्र नावाच्या लोकांची देवावर श्रद्धा असते. त्यांना धार्मिक स्थळांना भेट द्यायला आवडते. जर तुम्ही तुमच्या मुलाचं नाव भालचंद्र ठेवण्याचा विचार करत असाल तर आधी या नावाचा अर्थ जाणून घ्या. या नावाचा अर्थ डोक्यावर चंद्र असणे.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

अथर्व - गणेशजींचं हे नाव अतिशय अद्वितीय आणि सुंदर आहे. पौराणिक कथेत गणेशजींना अथर्व असंही म्हणतात. अथर्व नावाचा अर्थ असा आहे की जो सर्व अडचणींशी लढू शकतो.

अद्वैत - मुलासाठी अद्वैत नाव खूप चांगलं होईल. अद्वैत नावाचा अर्थ अद्वितीय आणि आत्म्याचे संघटन आहे. तुम्ही तुमच्या मुलाला गणपतीचे अद्वैत नाव देखील देऊ शकता.

गजकर्ण - जर तुमच्या मुलाचं नाव 'ग' अक्षरावरून पडले असेल तर तुम्ही गजकर्ण ठेवू शकता. नावाचा अर्थ 'हत्तीसारखे कान' असा आहे. या नावांच्या मुलांचे डोळे खूप सुंदर असतात.

एकदंत - जर तुमच्या मुलाचं नाव 'अ' अक्षरावरून ठेवणार असाल तर तुम्ही एकदंत देखील ठेऊ शकता.

गौरीसुत - तुम्ही तुमच्या मुलाचं नाव गौरीसुत देखील ठेवू शकता. हे नाव खूप गोंडस आहे. या नावाचा अर्थ आई गौरीचा मुलगा आहे.

महेश्वर - महेश्वर नावाच्या लोकांची देवावर श्रद्धा असते. या नावाचा अर्थ संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे.

शुभम - हे नाव खूप सामान्य आहे, परंतु या नावाचा अर्थ खूप खास आहे. या नावाचा अर्थ सर्व शुभ कार्यांचा स्वामी आहे.

अखुरथ - तुम्ही तुमच्या मुलाचं नाव अखुरथ देखील ठेवू शकता. हे नाव खूप खास आहे. या नावाचा अर्थ सारथी उंदीर आहे.

देवेंद्रशिक - हे नाव खूप चांगलं आहे. देवेंद्रशिख म्हणजे सर्व देवांचा रक्षक.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

शुभंकर - हे नाव खूप चांगले असेल. शुभंकर नावाचा अर्थ भाग्यवान, शुभ आणि समृद्धी देणारा असा आहे.

मृत्युंजय - मृत्युंजय हे एक अनोखं नाव आहे. जो या नामानं मृत्यूला पराभूत करतो.

भागेश - तुम्ही त्याला गुजराती नाव म्हणू शकता. भागेश नावाचा अर्थ आनंद आणि समृद्धी देणारा आणि भाग्यवान व्यक्ती असा आहे.

Web Title: Ganesh Chaturthi 2022 Name Your Children After Lord Ganapati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..