Shatrughan Sinha : ममता बॅनर्जी-नितीश कुमार आता मोदी राज संपवतील, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TMC MP Shatrughan Sinha Narendra Modi

'भाजपनं पैशाच्या बळावर महाराष्ट्रातील सरकार पाडलं आहे.'

ममता बॅनर्जी-नितीश कुमार आता मोदी राज संपवतील, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली : बिहारमधील सत्ताबदलानंतर टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा (TMC MP Shatrughan Sinha) यांनी भाजपवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) देशातून भाजपची राजवट संपवण्यासाठी एकत्र आले आहेत. विरोधी पक्ष आता पूर्वीपेक्षा मजबूत झाला असून आता सर्व विरोधक मिळून भाजपची (BJP) राजवट संपवतील, असा दावा त्यांनी केलाय.

बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा पुढं म्हणाले, 'नितीश कुमार यांनी भाजपला चोख उत्तर दिलंय. भाजपनं पैशाच्या बळावर महाराष्ट्रातील सरकार (Maharashtra Government) पाडलं, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता हिसकावून घेतली. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचूक उत्तर दिलंय.'

त्याचवेळी ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्या व्यतिरिक्त विरोधी छावणीतून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे जनता ठरवेल, असही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. मात्र, सर्व विरोधक आता देशातून मोदी राज संपवण्यासाठी एकत्र काम करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एका बाजूला एनडीए, तर दुसरीकडं संपूर्ण विरोधक एकत्र आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

शत्रुघ्न सिन्हा हे गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून टीएमसीचे खासदार झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. यानंतर त्यांनी अनेकवेळा पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. बाबुल सुप्रियो यांनी सोडलेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांनी ही जागा जिंकली होती.