...तर 56 इंचाच्या छातीचा काय उपयोग : सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

''तुमच्याकडे गरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल, तर नुसती 56 इंचांची छाती असून उपयोग नसतो''.

- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

म्हैसूर : ''मी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्यामुळे पंतप्रधान मोदी माझ्यावर टीका करत आहेत. मात्र, 2014 मध्ये नरेंद्र मोदींनीदेखील दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना हरण्याची भीती वाटत होती का'', असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विचारला. तसेच तुमच्याकडे गरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल, तर नुसती 56 इंचांची छाती असून उपयोग नसतो, असे टीकास्त्रही सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींवर सोडले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या चामराजनगर येथील सभेत सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांच्या या टीकेला सिद्धरामय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली लोकसभेची निवडणूक दोन मतदारसंघातून लढवली होती. त्यांनी असे करायची गरज काय होती. मी दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असल्यामुळे मोदी माझ्यावर टीका करत आहेत. मात्र, 2014 मध्ये नरेंद्र मोदींनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना हरण्याची भीती वाटत होती का'', असा सवाल सिद्धरामय्या यांनी विचारला. 

Web Title: CM Siddaramaiah Criticizes Prime Minister Narendra Modi