esakal | Happy Birthday YSJagan : सोळा महिने राहिला जेलमध्ये अन् बाहेर येताच झाला मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

jagmoan.jpg

Happy Birthday YSJagan : सोळा महिने राहिला जेलमध्ये अन् बाहेर येताच झाला मुख्यमंत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आंध्र प्रदेश या राज्याचे राजकारण ज्या नावाभोवती फिरते आहे, ते म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाई. एस. जगमोहन रेड्डी हे होय. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सोशल मिडीयातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. 

सप्टेंबर 2009 मध्ये एका विमान दुर्घटनेत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा म़ृत्यू झाला. त्यानंतर सगळ्या राजकीय धुरंधरांचे लक्ष त्यांचा मुलगा जगमोहन रेड्डी यांच्याकड़े लागले. त्यांनी देखील काॅग्रेसकडे आपण मुख्यमंत्री बनण्यास इच्छूक असल्याचे सांगितले, परंतू काॅग्रेसने त्यांना डावलले.

Video : अन् पोलिसांनी चक्क आंदोलकांसह गायले राष्ट्रगीत!

दरम्यान, त्यानंतर त्यांच्यावर संपत्तीवरून अनेक आरोप ठेवून त्यांच्याविरोधात अनेक केस फाईल करण्यात आल्या. त्यानंतर ते काॅग्रेसपासून दूर गेले, व त्यांनी वाय. एस. आर. काॅग्रेस नावाचा पक्ष काढला. हा पक्ष आज राज्यात सत्तेवर आहे. मुख्यमंत्री होण्याअगोदर जगमोहन रेड्डी यांना अनेक अग्निपरिक्षा द्याव्या लागल्या. त्याअगोदर 16 महिने त्यांना जेलमध्ये राहावे लागले. त्यानंतर ते बाहेर पडून आपल्या पक्षवाढीसाठी फिरू लागले. त्यांनी 4 हजार किलोमीटरची यात्रा करून पक्ष मजबूत केला. आज हा पक्ष सत्तेत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या होत्या. वडिलांच्या मृत्यूनंतर जगमोहन रेड्डी यांच्यावर अनेक केस दाखल करण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यावर ईडीने करवाई केली. एका काळात काॅंग्रेस म्हणजे वाय. एस. राजशेखर रेड्डी तसेच वाय. एस. राजशेखर रेड्डी म्हणजे काॅग्रेस असेच चित्र आंध्र प्रदेशमध्ये होते.

नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार

मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर का्ॅग्रेस व जगमोहन रेड्डी यांच्यामध्ये वाद सुरु झाले. जगमोहन रेड्डी हे पक्षापासून दूर गेले. त्यांनी त्यानंतर आपल्या वडिलांच्या नावाने पक्ष काढला. आणि आज तो पक्ष राज्याच्या सत्तेत आला आहे. वाय. एस. जगमोहन रेड्डी यांचे खूप मोठे कष्ट यामागे आहेत. हे कोणीही नाकारू शकत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका काळात जेलमध्ये राहिलेला तरुण आज राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. रायल सीमा या भागात आजही रेड्डी यांची शक्ती एवढी मोठी आहे की, या परिसरत एकही नेता त्यांना टक्कर देऊ शकत नाही. वर्षानुवर्षे रेड्डी घराणे आजही कडप्पा जिल्ह्यातून रेड्डी घराण्यातील उमेदवार निवडून येतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.