

Yogi Adityanath's Mother Savitri Devi Dies
Esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या मूळ गावी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनामुळे योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगी आदित्यनाथ त्यांचा दौरा सोडून थेट पंचूर या मूळ गावी पोहोचले. आईला श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. दरम्यान आईला भेटण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिल्याची माहिती समोर आली आहे. या महिन्यात आईची भेट घेण्याचा त्यांचा विचार होता. पंचूर दौऱ्याचे नियोजन सुरू होते पण त्यापूर्वीच सावित्री देवी यांचे निधन झाले.