esakal | Pegasus: 'विरोधकांच्या खोट्या आणि तथ्यहिन आरोपांनी देशाची बदनामी'
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi-Adityanath

Pegasus: 'विरोधकांच्या खोट्या आणि तथ्यहिन आरोपांनी देशाची बदनामी'

sakal_logo
By
विनायक होगाडे

लखनऊ : सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी पेगॅसस प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ घातला आहे. त्यामुळे कामकाज सुरु झाल्यानंतर चार मिनिटाच्या आतच लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तर राज्यसभा 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलीये. पेगॅसस स्पायवेअरच्या तंत्रज्ञानातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह इतर राजकीय नेते आणि पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. जगभरातील 16 माध्यम संस्थांनी याबाबत दावा केला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेससह विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर भाजपने स्पष्टीकरण द्यावं, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

हेही वाचा: पॉर्न फिल्म रॅकेट: राज कुंद्राने बनवला H accounts नावाचा WhatsApp ग्रुप; वाचा सविस्तर

याबाबत आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, विरोधक पाळत प्रकरणाच्या आडून संसदेतील चर्चेला आडकाठी आणू पाहत आहेत. तसेच खोटे आणि तथ्यहिन आरोप लावून देशाला बदनाम करत आहेत. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंय की, हा एका मोठ्या कटकारस्थानाचा भाग आहे. जिथे संसदेचं सत्र होण्याआधीच याप्रकारचे मनाला येईल तसे आरोप लावले जातात. संसदेतच्या या सत्रामध्ये शेतकरी आणि कोरोनावर चर्चा होणार आहे. मात्र, विरोधक आपल्या ताकदीनीशी या सत्राचं कामकाज वाया घालवू इच्छित आहेत. हा लोकशाहीचा अपमान आहे. देशाला बदनाम करण्यासाठी विरोधकांची ही कुत्सित खेळी कधीच यशस्वी होणार नाही.

हेही वाचा: कर्नाटकात नवा मुख्यमंत्री 28 जुलैला?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हल्ला करत म्हटलंय की, जेंव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते. त्यावेळी देखील दंगलीचे कटकारस्थान रचले गेले. हे सगळे देशाला अस्ताव्यस्त करण्याचे प्रयत्न आहेत. विरोधक देशाची प्रतिमा मलिन करत आहेत.

पुढे ते म्हणाले की, विरोधकांना या देशातील मागास समाजातील लोक पुढे यावेत, असं वाटत नाही. या कारणामुळेच जेंव्हा संसदेच्या सत्राच्या पहिल्या दिवशीच दलित आणि मागास समाजातील मंत्र्यांचा परिचय करवून दिला जाणार होता, तेंव्हा विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. मागास लोकांनी पुढे यावं, असं विरोधकांना वाटत नाही. हे शेतकऱ्यांची देखील दिशाभूल करत आहेत. मात्र, हे लोक आपल्या या प्रयत्नांमध्ये कधीच यशस्वी होणार नाहीत.

loading image