उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीपूर्वी राज्याच्या महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब आणि वंचित कुटुंबातील महिलांना मोफत सिलिंडरची (Free Cylinder) भेट दिली..या कार्यक्रमादरम्यान सीएम योगी यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत कठोर इशारा दिला. ते म्हणाले, "जर कोणी मुलींच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केला, तर हे निश्चित समजा की पुढच्या चौकात यमराज तिकीट फाडण्यासाठी उभा असेल. ते पुढे म्हणाले, "कोणाला तिकीट फाडून घ्यायचे असेल, तर त्यांनी मुलींची छेडछाड करून दाखवावी. हे फक्त योगी सरकारच करू शकते.".उज्ज्वला योजनेतून १५०० कोटीं रुपयांचा लाभ'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'अंतर्गत १,५०० कोटी रुपये रकमेच्या गॅस सिलिंडर रिफिल सबसिडी वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी १.८६ कोटी पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला..कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता, मुख्यमंत्री योगींनी अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "२०१७ पूर्वी या राज्यात केवळ 'सैफई' कुटुंबाचाच विचार केला जात होता. सगळेजण चाचा-पुतण्या आणि महाभारतातील नात्यांभोवतीच फिरत होते.".Ladki Bahin Yojna E-KYC साठी मोठी अपडेट, Aditi Tatkare यांची मोठी घोषणा | Sakal News .माफियांच्या समोर नाक घासायचे दिवस संपलेसीएम योगी यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाचे मंत्री आणि मुख्यमंत्री माफियांच्या समोर नाक घासत असत. "पण आता तसे होत नाही. पूर्वी एकाच कुटुंबातील लोक सरकारी योजना आणि नोकऱ्यांमध्ये लूटमार करायचे, दरोडे टाकायचे. त्यांच्या काळात उत्साहाचा प्रत्येक सण दंगलींच्या (Riots) बळी जायचा. ते तरुणांच्या रोजगारावरही दरोडे टाकत होते," अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री योगींनी दिलेल्या या स्पष्ट आणि कडक इशाऱ्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार किती गंभीर आहे, हे दिसून आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.