"योगींना ठोकता येतं, अखिलेश यादवांनी जपून रहावं" - साक्षी महाराज

वादग्रस्त विधानामुळं साक्षी महाराज पुन्हा एकदा चर्चेत
Sakshi Maharaj
Sakshi Maharaj

नवी दिल्ली : वाचाळ भाजप खासदार साक्षी महाराज हे कायमच वादग्रस्त विधानं करत असतात. पुन्हा एकदा त्यांनी असंच एक विधान केलं आहे. टीव्ही चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना धमकीवजा सल्ला दिला आहे. "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठोकता येतं, अखिलेश यांनीही जपून रहावं" या वादग्रस्त विधानामुळं साक्षी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Sakshi Maharaj
बनावट दारु विक्री केल्यास फाशीची शिक्षा; मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

सन २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत केलेल्या विधानाचा खासदार साक्षी महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "अखिलेश यादव आम्हाला म्हणाले योगींना कॉम्प्युटर चालवता येत नाही, पण त्यांना ठोकता येतं. यावर मी पत्रकारांना म्हटलं की, अखिलेश यांना समजावून सांगा की त्यांना ठोकता येतं तर जरा जपून राहा, तुमचा नंबर ना येवो. त्यांनी कबूल केलं आहे की, योगींना ठोकता येत. मग दुष्टांना ठोकायचं नाही का? दहशतवाद्यांना ठोकायचं नाही का? ज्या लोकांनी बेकायदा जमीनी बळकावल्या आहेत त्यांना ठोकायचं नाही का?"

Sakshi Maharaj
Pegasus प्रकरणी आता एडिटर्स गिल्डची सुप्रीम कोर्टात धाव; SIT तपासाची मागणी

अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर भाष्य करताना म्हटलं होतं, "योगींना तर कॉम्प्युटर चालवता येत नाही" यावर साक्षी महाराज म्हणाले, "आपल्याला इतका चांगला मुख्यमंत्री मिळाला आहे, इतका चांगला पंतप्रधान मिळाला आहे. तसेच इतका चांगला आमदारही मिळाला आहे."

Sakshi Maharaj
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मान्यता

मुस्लिमविरोधी विचारांमुळं साक्षी महाराज कायम वादाच्या केंद्रस्थानी असतात. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारावेळी त्यांनी म्हटलं होतं की, "मला वाटतं ही निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com