
एकाच कार्यालयात एका पोस्टचे दोन अधिकारी आल्यानं विचित्र अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कार्यालयात दोन अधिकारी एकाच पोस्टचे दाखल झाल्यानं खुर्चीवर कोण बसणार यावरून राडा झाला. कानपूरच्या आरोग्य विभागात ही घटना घडली आहे. चिफ मेडिकल ऑफिसरच्या कार्यालयात सीएमओच्या खुर्चीत कोण बसणार यावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. विद्यमान चीफ मेडिकल ऑफिसरला निलंबित केल्यानं सरकारने दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. दरम्यान, निलंबित अधिकाऱ्यानं कोर्टाकडून निलंबनाच्या आदेशाला स्थगिती आणली.