esakal | कोव्हॅक्सिनला जागतिक मान्यता नाहीच । Co-Vaccine
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

कोव्हॅक्सिनला जागतिक मान्यता नाहीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लशीला मान्यता मिळवण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या प्रयत्नांना आज धक्का बसला. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मान्यता देण्यासाठी आणखी संकलित माहिती (डेटा) द्या, अशी मागणी करत मान्यतेसाठी आणखी काही दिवस उशीर लागेल, असे आज सांगितले.

हेही वाचा: गुलाबनंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्र-गुजरातला अलर्ट

कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या लशींना जागतिक मान्यता मिळावी यासाठी भारताने दीर्घकाळापासून जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, कोव्हॅक्सिन लसीबाबत निराशा हाती येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून महिनाअखेर कोव्हॅक्सिनला निश्चित मान्यता मिळेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले जात होते.

loading image
go to top