झारखंडमध्ये खाण दुर्घटनेत 40 कामगार अडकले 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

या खाणीमध्ये नेमके किती कामगार, यंत्रे आणि वाहने अडकली आहेत, यासंदर्भात अद्याप निश्‍चित माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

रांची : झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील कोळशाच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत अनेक कामगार अडकले आहेत. सात कामगार जखमी झाले आहेत. 

लाल माटिया भागातील या खाणीमध्ये काल रात्री उशीरा ही दुर्घटना घडली. 40 ते 50 कामगार खाणीत अडकल्याची शक्‍यता आहे. या भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. मदतकार्यासाठी पथके घटनास्थळी लगेचच दाखल झाली. धनबाद आणि पाटण्याहून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे एक पथकही रवाना झाले आहे. 

मुख्यमंत्री रघुबर दास या परिस्थितीवर आणि मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. 

या खाणीमध्ये नेमके किती कामगार, यंत्रे आणि वाहने अडकली आहेत, यासंदर्भात अद्याप निश्‍चित माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Coal mine collapses in Jharkhand; 40 workers feared trapped