Modi Kahin Nahi Jayenge Slogan
esakal
भाजपकडून दिल्या जाणाऱ्या ‘मोदी कुठेही जाणार नाहीत’ या घोषणेवर आता कॉकरोच जनता पार्टीने आक्षेप घेतला आहे. पक्षाचे नेते सौरभ दास यांनी ही घोषणा म्हणजे अहंकार असल्याची टीका केली आहे. एखाद्या राजकीय नेत्याने स्वतःबद्दल अशा प्रकारची घोषणा करणं हे सत्तेची लालसा आणि भीती दर्शवणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या घोषणेवरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.