esakal | गॅस सिलेंडरवरील 'हा' कोड तुमच्या सुरक्षेशी संबंधीत; जाणून घ्या कसा?
sakal

बोलून बातमी शोधा

Gas code

गॅस सिलेंडरवरील 'हा' कोड तुमच्या सुरक्षेशी संबंधीत; जाणून घ्या कसा?

sakal_logo
By
अमित उजागरे

स्वयंपाकासाठी सर्वच घरांमध्ये आता एलपीजी गॅस वापरला जातो. हा गॅस ज्या सिलेंडरमधून आपल्या घरापर्यंत येतो त्या सिलेंडरवर विशिष्ठ ठिकाणी काही महत्वपूर्ण माहिती कोड स्वरुपात दिलेली असते. ग्राहकांना याबाबत सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. सिलेंडर संदर्भातील अशीच एक महत्वाची गोष्टी आपण जाणून घेणार आहेत.

हेही वाचा: मुंबई: व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा

गॅस सिलेंडर उचलण्यासाठी वरच्या बाजूला लोखंडी रिंग असते ती ज्या तीन लोखंडी पट्ट्यांनी सिलेंडरशी जोडली गेलेली असते त्यातील एका पट्टीवर काळ्या रंगामध्ये इंग्रजीतील एक मुळाक्षर आणि एक नंबर यांचा एकत्रितपणे एक कोड दिलेला असतो. प्रत्येक सिलेंडरसाठी हा कोड वेगळा असतो. विशेष म्हणजे या कोडचा आपल्या सुरक्षेशी संबंध आहे, त्यामुळं त्याबाबतची माहिती करुन घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा: 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना लखनऊमध्ये अटक, कुकर बॉम्ब जप्त!

हा कोड तयार करण्यासाठी इंग्रजीतील A, B, C, D या चार अल्फाबेट्सचा वापर केला जातो. याचा संबंध वर्षातील महिन्यांशी जोडलेला आहे. म्हणजेच A चा वापर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने दर्शवण्यासाठी केला जातो. तर B चा वापर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी केला जातो. C चा वापर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी केला जातो. त्याचबरोबर D चा वापर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या शेवटच्या तीन महिन्यांसाठी केला जातो.

हेही वाचा: अमित शाहांच्या सहकार खात्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

या इंग्रजीतील अल्फाबेट्सनंतर येणाऱ्या आकड्यांचा वापर विशिष्ट वर्ष दर्शवण्यासाठी केला जातो. म्हणजेच ज्या वर्षामध्ये या सिलेंडरची सुरक्षा चाचणी करण्यात येणार आहे, त्यावर्षीचा हा आकडा असतो. उदाहरणार्थ, B-30 असा कोड असल्यास त्याचा अर्थ संबंधित सिलेंडरची तपासणी २०३० सालातील एप्रिल, मे किंवा जून महिन्यात केली जाईल. ही तारीख कायमच पुढील वर्षांमधील असणं गरजेचं आहे. जर ही तपासणीची तारीख निघून गेलेली असेल तर तो सिलेंडर वापरण तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

गॅस सिलेंडरची एक्सपायरी किती असते?

भारतात तयार होणाऱ्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची वैधता किंवा एक्सापयरी निश्चित करण्यासाठी BIS 3196 मानकांचं पालन केलं जातं. या मानकांनुसार तयार झालेल्या गॅस सिलेंडरचं जीवन १५ वर्षे निश्चित केलं जातं. दरम्यान, प्रत्येक सिलेंडरची दोन वेळेला सुरक्षा चाचणी केली जाते. पहिली चाचणी दहा वर्षांनंतर होते त्यानंतर दुसरी चाचणी पाच वर्षांनी होते.

loading image