esakal | लखनऊमधून 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना अटक, कुकर बॉम्ब जप्त!
sakal

बोलून बातमी शोधा

Cooker bomb seized

'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना लखनऊमध्ये अटक, कुकर बॉम्ब जप्त!

sakal_logo
By
अमित उजागरे

लखनऊ : उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचा कट दहशतवादी विरोधी पथकानं (ATS) उधळून लावल्याचे वृत्त आहे. हल्ल्याच्या तयारीत असलेल्या 'अल कायदा' या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्यांना एटीएसनं लखनऊ येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून कुकर बॉम्ब आणि टाईम बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. शहरातील सीतेबिहारी कॉलनीत दहशतवादी लपून बसल्याची खबर एटीएसला मिळाली होती. (Uttar Pradesh Two Al Qaeda terrorists held in Lucknow Kakori)

खबऱ्यांच्या माहितीनुसार एटीएसनं टाकलेल्या छाप्यात संबंधित घरातून प्रेशर कुकरच्या तंत्रानं तयार केले जाणारे अर्धवट अवस्थेतील दोन बॉम्ब आढळून आले. येत्या दोन-तीन दिवसांत हे दहशतवादी मोठा स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. या अटकसत्रानंतर एटीएसनं संपूर्ण भागाची नाकाबंदी केली आहे.

हेही वाचा: मुंबईत पावसाची उसंत; तलावातील पाणीसाठी होतोय कमी

या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी एटीएसनं एका संशयीत व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून माहिती मिळाल्यानंतर आज (रविवारी) सकाळी एटीएसने सिराज, रियाज आणि शाहीद ऊर्फ गुड्डू नामक व्यक्ती राहत असलेल्या घरात छापेमारी केली. त्यानंतर एटीएसनं वसीम शाहीद यांना अटक करुन आपल्यासोबत घेऊन गेले.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न

दरम्यान, एटीएसनं छापेमारी केलेल्या घरातील लोकांकडे चौकशी केली तसेच घराची झाडाझडती घेतल्यानंतर या घरात त्यांना प्रेशर कुकर बॉम्ब तसेच टाईम बॉम्ब आढळून आले. एटीएसच्या कारवाईमुळं या भागात एकच खळबळ माजली. त्यानंतर एटीएसच्या टीमनं परिसराची नाकाबंदी करत शोध मोहिम सुरु ठेवली आहे.

loading image