

UP Cold Storage Accident Former MLA Linked Facility Sees Deadly Collapse
Esakal
प्रयागराजमध्ये एका कोल्ड स्टोरेजची इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. गद्दोपूरजवळ असलेल्या चंदापूरमध्ये एक कोल्ड स्टोरेजची इमारत कोसळली. यात ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोल्ड स्टोरेजमधून अमोनिया गॅसची गळती होत आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.