
Cold Wave : थंडीत बाहेर पडू नका, नाहीतर येईल हार्ट अटॅक! डॉक्टरांनी केलं सतर्क
मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून पुढील तीन दिवस देखील थंडी कमी होण्याची चिन्हे नाहीयेत. पुढील 3 दिवस दिल्लीत थंडीची लाट कायम राहणार असून दृश्यमानता शून्य मीटर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे, जानेवारीनंतरच ही थंडीची लाट कमी होण्याची शक्यता वर्तवन्यात आली आहे.
दरम्यान या दरम्यान डॉक्टरांकडून थंडीच्या दिवसात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दिल्लीत तापमान किती राहिल?
भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, आज रात्री दिल्लीत थंडी असेल आणि तापमान 3-4 अंशांच्या आसपास असेल. काही स्थानकांवर 2 अंश तापमान असू शकते. पण 10 जानेवारीपासून दाट धुके, थंडीची लाट असणार नाही.
हेही वाचा: Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच
हवामान विभागाने पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान, बिहारमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांवर दाट ते दाट धुके पडेल. त्याच वेळी, असेही म्हटले आहे की कार चालवणाऱ्या लोकांनी वेग मर्यादा पाळावी आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे.
हेही वाचा: Khan Sir : 'खान सर' इतके फेमस का आहेत माहितेय? हा Viral Video एकदा पाहाच
डॉक्टर काय म्हणालेत?
फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज कुमार यांनी थंडीच्या वातावरणात हृदयविकाराच्या वाढत्या घटनांबाबत माहिती दिली आहे, हिवाळ्यात वृद्धांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो, परंतु आजकाल तरुणांमध्येही हा धोका दिसून येतो. हे टाळण्यासाठी लोकांनी हिवाळ्यात सूर्योदयापूर्वी सकाळी फिरायला जाणे टाळावे असा सल्ला देखील दिला आहे.
मनोज कुमार पुढे म्हणाले की, हिवाळ्यात मद्यपान आणि धूम्रपान केल्याने शरीर उबदार राहते, हा एक प्रकारचा समज आहे. असे काहीही नाही, लोकांनी घरात सक्रिय असले पाहिजे परंतु बाहेरील फिरणे टाळावे.
हेही वाचा: "चहा पिऊ शकत नाही, तुम्ही विष…"; अखिलेश यादवांचा पोलिस मुख्यालयातील Video Viral
दिल्लीतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद
थंडीच्या लाटेमुळे दिल्ली सरकारने सर्व खासगी शाळा रविवारी 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीचे किमान तापमान 1.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते त्यानंतर दिल्ली सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे.