सरकारने जप्त केलेला काळा पैसा गरिबांना द्या: मायावती

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेला काळा पैसा गरिबांच्या खात्यात जमा करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रमुख मायावती यांनी केली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेला काळा पैसा गरिबांच्या खात्यात जमा करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रमुख मायावती यांनी केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना मायावती म्हणाल्या, "नोटाबंदीच्या निर्णयाला 37 दिवस झाले आहेत. तरीही लोक त्रस्त असल्याचे चित्र आहे. गरीब, कामगार आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने जप्त केलेला काळा पैसा गरिबांना द्यावा. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत.' उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमध्ये पराभूत होण्याची भीती वाटत असल्यानेच त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासूनच काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला विरोध करत आहोत. मात्र केंद्र सरकारने कोणालाही न विचारता हा निर्णय घेतला गेला. कारण त्यामागे काळा पैसा संपवणे हा हेतू नव्हता तर त्यांना पराभवाची भीती होती.'

"मोदींबाबतची वैयक्तिक माहिती, त्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे ते मला बोलू देत नाहीत', असा दावा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला होता. यावरून आज लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Web Title: Collected black money must be deposited in the accounts of the poor: Mayawati