शॉपिंग मॉलमध्ये चॉकलेट चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल; विद्यार्थीनीची आत्महत्या

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुलीने संपवलं जिवन
Crime News West Bengal
Crime News West Bengalesakal

West Bengal: पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अलीपूरद्वार येथे एका शॉपिंग मॉलमध्ये चॉकलेट चोरतानाचा मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळं तिने हे पावूल उचलल्याचं सांगितल जात आहे.

मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार, मुलगी 29 सप्टेंबर रोजी आपल्या बहिणीला घेवून परिसरातील एका शॉपिंग मॉलमध्ये गेली होती आणि तेथून निघताना चॉकलेट चोरताना तिला पकडले गेले. यानंतर तिने चॉकलेटची किंमत दिली आणि स्टोअरच्या मालकाची माफी देखील मागितली. मात्र, या घटनेदरम्यान दुकानात उपस्थित लोकांनी त्या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला जो व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अपमानित झालेल्या मुलीने हे पाऊल उचलले.

Crime News West Bengal
Maharashtra Political Crisis: आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्या फैसला? शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तिचा मृतदेह तिच्या घरात फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. जयगावचे प्रभारी अधिकारी प्रबीर दत्ता यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, सर्व माहिती घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com