कर्नाटकात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

कर्नाटकात एका महाविद्यालयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला. या बलात्कार प्रकरणाचा व्हिडिओही काढण्यात आला होता. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.

नवी दिल्ली : कर्नाटकात एका महाविद्यालयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला. या बलात्कार प्रकरणाचा व्हिडिओही काढण्यात आला होता. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली. 

या बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती सोशल मीडिया सेलने देताच तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समोर आले. हा व्हिडिओ किती प्रमाणात शेअर झाला, हे आता तपासणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक बी. लक्ष्मी प्रसाद यांनी दिली.

तसेच आम्ही लोकांना हा व्हिडिओ शेअर करु नका. अथवा आपल्या मोबाइल किंवा संगणकात सेव्ह करु नका, असे आवाहन केले. मात्र, असे करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात येईल असेही सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College Student Gang Raped Video Viral Five Arrested