
Sofia Qureshi: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं आज पीओकेत एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांना निशाणा बनवण्यात आलं. अर्ध्या तासात दहशतवाद्यांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या भारतीय सैन्य दलांच्या या कामगिरीची माहिती, कर्नल सोफिया कुरेश आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दोन्ही महिला अधिकारी दिवसभर चर्चेत होत्या. पण आता कर्नल कुरेशी यांच्या कुटुंबियांनी आपल्या लेकीचं भरभरुन कौतुक केलं आहे.