दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान

दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान

बिश्टेक : श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाला तोंड देण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचे फंडिंग बंद केले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

बिश्टेक येथे 'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन' परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी झाले आहेत. यामध्ये त्यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत ते म्हणाले, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा खरा चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाविरोधात एकत्र येणे गरजेचे आहे.

दरम्यान, एससीओ देशांच्या पर्यटकांसाठी लवकरच हेल्पलाइन जारी केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com