Bhuvan Bam
esakal
प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेता भुवन बाम सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल विद्यापीठात आयोजित कॉमेडी कार्यक्रमात कथित अश्लील टिप्पणी आणि आक्षेपार्ह कृती केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी वाघोडिया पोलिस ठाण्यात भुवन बाम याच्यासह संबंधित आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये आणि गाणी सादर केल्याचा आरोप आहे.