दोनशे कमांडो करणार "फिदायीन'शी दोन हात

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

श्रीनगर ः जम्मू आणि काश्‍मीरमध्ये होणारे आत्मघातकी हल्ले (फिदायीन) रोखण्यासाठी दोनशे कमांडोंचा समावेश असलेले एक विषेश पथक तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा दलातील विविध तज्ज्ञांनी पोलिस दलातील निवडक दोनशे जणांना यासाठी प्रशिक्षण दिले असून, हे पथक आता दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी सज्ज झाले आहे. गेल्या काही दिवसांत लष्कराच्या मुख्यालय व इतर ठिकाणांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर असे पथक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे त्यांचे प्रशिक्षण पार पडले.

Web Title: commandos to fight fidayeen