स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महाग 

gas-cylinder
gas-cylinder

नवी दिल्ली - तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या (LPG cyliner) किमती वाढविल्या आहेत. देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी असणाऱ्या ‘आयओसी’ने दिलेल्या माहितीनुसार, १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. १९ किलो सिलिंडर गॅस आता ३६.५० रुपयांनी, तर ५ किलो सिलिंडर गॅस १८ रुपयांनी महागला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्ली (Delhi) आणि मुंबईत (Mumbai) आता गॅस सिलिंडर ६४४ रुपये झाला आहे. एक डिसेंबर रोजी तो ५९४ रुपये होता. कोलकत्यात आता ६२०.५० रुपयांच्या सिलिंडरची किंमत ६७०.५० रुपये झाली आहे. 

सरकार दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला १४.२ किलो गॅस सिलिंडरसाठी अनुदान देते. यानंतर, त्यावर्षी १३ व्या सिलिंडरला अनुदान मिळत नाही, म्हणजे १२ हून अधिक सिलिंडर घेतले जातील, त्यांना बाजारभावाने खरेदी करावी लागेल. 

इथे तपासा आपल्या शहरातील किंमत 
तेल कंपन्या दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय दरांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित करतात. गॅसच्या किमती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देता येईल. येथे आपल्या शहराचे नाव निवडून आपल्या शहरातील गॅसचे दर जाणून घेता येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com