
महागाईत कंपन्याचा अनोखा फंडा; पॅकेट्सची किंमत न वाढवताही नफ्यात
नवी दिल्ली : सततच्या वाढत्या महागाईच्या काळात अनेक कंपन्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या पॅकेटच्या किमती वाढवल्या नाहीत. तुम्ही विचार करत असाल की ही चांगली गोष्ट आहे. पण हे अर्ध सत्य आहे. याची दुसरी बाजू अशी आहे की, कंपन्यांनी पॅकेटमध्ये येणाऱ्या मालाचे प्रमाण मात्र कमी केले आहे. भुजिया किंवा साबण यासारख्या अनेक दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या वस्तुंबाबत हे केलं जात आहे.
या वस्तूंचे पॅकेट्स वजनाने कमी होण्यामागे महागाई हेच कारण आहे. परंतु जवळपास सर्वच कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची मागणी कायम ठेवण्यासाठी हे धोरण अवलंबले आहे. जेव्हा पॅकचे वजन कमी केले जाते तेव्हा ग्राहकाला महागाईची तिव्रता जाणवत नाही, जर दर वाढले तर महागाई दिसून येते आणि ग्राहक त्या वस्तूची खरेदी थांबवण्याचीही शक्यता असते.
कंपन्या फिक्स किंमतीच्या वस्तूंचे वजन कमी करून उत्पादन किंमत एडजस्ट करत आहेत. कमी उत्पन्न आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून या उत्पादनांच्या किमती वाढवण्याऐवजी आकार किंवा वजन कमी करण्याचा फंडा कंपन्यांनी स्वीकारला आहे. खाद्यतेल, तृणधान्ये आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमध्ये, युनिलिव्हर पीएलसीची भारतीय शाखा आणि देशांतर्गत ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड, डाबर इंडिया लिमिटेड यासह इतरही अनेक कंपन्या अशा कमी किंमतीचे पॅकेजेसचे वजन कमी करत आहेत.
तज्ञांच्या मते, कंपन्यांच्या वतीने पॅकेटचे वजन कमी करणे ही भारतासाठी नवीन गोष्ट नाही. यूएसमध्ये, सबवे रेस्टॉरंट्स, डॉमिनोज पिझ्झासह इतर कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी प्रोडक्ट्सचा आकार कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. गेल्या चार महिन्यांपासून इंडियन कंज्यूमर प्राइस, म्हणजेच महागाई मध्यवर्ती बँकेच्या 6 टक्क्यांच्या वरच्या मर्यादेच्या वर गेल्यावर कंपन्यांनी हे धोरण अवलंबले आहे. एप्रिलमध्ये महागाईचा दर 7.8 टक्के म्हणजे 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
हेही वाचा: अडवाणींवर कोणती कारवाई केली?; औरंगजेब कबर प्रकरणी काँग्रेसचा सवाल
हा एकमेव उपाय आहे
लाईव्हमिंटने दिलेल्या रिपोर्टनुसार हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य वित्त अधिकारी रितेश तिवारी म्हणाले की, आपल्याला पुढील 2 ते 3 तिमाहींमध्ये आणखी महागाई पाहायला मिळेल. काही पॅकमधील व्हॉल्यूम कमी करणे हा आमच्यासाठी दरवाढ रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या उत्पादनाचे महत्त्व यावरून कळू शकते की 10 पैकी 9 भारतीय कुटुंबे या कंपनीचे उत्पादन दररोज वापरतात.
हेही वाचा: टाटाची Nexon EV Max लाँच, एका चार्जवर चालते 437 किमी; पाहा किंमत-फीचर्स
Web Title: Companies Shrink Weight Of Bhujia Packets Soap Packs To Cut Costs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..