
अजानची तुलना ‘अखंड पाठा‘ बरोबर केल्याने नवा वाद
नवी दिल्ली - मशिदींवरील (Masjid) लाऊडस्पीकरचा (Loudspeaker) आवाज (Sound) व त्यामुळे होणाऱया कथित ध्वनीप्रदूषणाचा (Polution) मुद्दा तापत चालला असून मुस्लिम धर्मगुरूंतर्फे अजानची (Ajaan) तुलना अखंड पाठ (Akhand Path) म्हणजेच भजन- कीर्तन नामसप्ताहाबरोबर केली गेली आहे. ‘ २-३ मिनीटांत संपणाऱया ‘अजान' मुळे ध्वनीप्रदूषण होते अशी तक्रार करणारे २४ तास चालणाऱया अखंड पाठामुळे होणाऱया ध्वनीप्रदूषणाकडे पहात नाहीत, हे आश्चर्य आहे असे मत सुन्नी उलेमा परिषदेचे महासचिव हाजी मोहम्मद सालीस यांनी व्यक्त केले आहे.
कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यांत मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वातावरण तापविले जात आहे. यावर्षीच्या अखेरीस निवडणुका होणाऱया गुजरातेत हा मुद्दा २००१ नंतर वारंवार चर्चेत आलेला आहे. दिल्लीतील भाजपच्या महापौरांसह खासदार प्रवेश वर्मा व इतर भाजप नेत्यांनी चैत्री नवरात्रीत मासविक्रीच्या दुकांनावर बंदी घालण्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात संघाच्या पथसंचालनावर पुष्पवृष्टी केल्याने, भाजपचा झेंडा घरावर लावल्याने किंवा भाजपचा प्रचार केल्याने अनेक उच्चसिक्षित मुस्लिम तरूणांना कट्टरपथीयांकडून धमक्या मिळण्याचे प्रकार वाढले आहेत.
हाजी सालीस यांनी या वादात उडी घेताना अजानची तुलना अखंड पाठाबरोबर केल्याने यावरील वाद तापण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. कर्नाटकातील ३०० हून जास्त मशिदींना लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादेत ठेवण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. हाजी सालीस म्हणाले की देशाला द्वेष व घृणेच्या वातावरणात डकलण्याचे प्रकार सुरू असून ते योग्य नाहीत. वातावरण इतके बिघडले आहे की तुम्ही टोपी घालता, दाढी ठेवता किंवा हिजाब परिधान करता तरकाही लोकांना अडचण वा समस्या वाटू लागली आहे. या मुद्यावरून जमावाकडून हल्ले होऊन लोकांचे जीव जातात. आम्ही काय खातो याचीही चर्चा होते. असा गोष्टींवर तकी चर्चा सुरू होणे हे अनाकलनीय आहे.
हे भितीदायक वातावरण आहे. शतकानुशतके भारतातील प्रत्येक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत. पण सध्या वातावरणातील सलोखा धोक्यात आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न का सुरू आहेत ते समजायला मा४ग नाही. राजकारण त्याच्या ठिकाणी असावे, तयाच धर्माला ओढळे जाणे योग्य नाही. मशिदींतील अजान किती वेळाची असते तर ती २ ते ३ मिनीटांत संपते. मात्र जेव्हा मोठ्या आवाजांत लाऊडस्पीकर लावून २४ तास अखंड पाठासारखे कार्यक्रम होतात तेव्हा त्यात यंना ध्वनीप्रदूषण दिसत नाही. हा द्वेष पसरविणाऱया शक्तींच्या विरोधात लोकांनाच पुढे यावे लागेल असेही त्यांनी आवाहन केले.
दरम्यान मशिदींवरील आवाज मर्यादित कक्षेत ठेवण्यासाठी एक डिव्हाईस लावण्याच्या सूचना दिल्याचे जामा मशिदीचे इमाम मोहम्मद इमरान राशदी यांनी नमूद केले.
रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱयांना रोज दोन तास कामावरून सुटी देण्याचा वादग्रस्त आदेश दिल्ली सरकारच्या जलमंडळाने माघारी घेतला आहे. भाजपने याला कडाडून विरोध केला होता. रमजानच्या महिन्यात जल मंडळाच्या मुस्लिम साऱया कर्मचाऱयांना रमजानचा महिनाभर कार्यालयीन वेळेत प्रतीदिन दोन तासांची पगारी सुटी दिली जाईल असे जाहीर करण्यात आले होते. पण भाजपने याविरूध्द दिल्लीभर प्रदर्शने सुरू करताच दिल्लीतील आप सरकारने २४ तासांच्या आत यू टर्न घेऊन तो आदेशच आज रद्द केला.
Web Title: Comparing Ajaan With Akhand Path Is A New Controversy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..