भरपाई करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘त्रिसूत्री’ आखली

कोरोनामुळे अनेक क्षेत्राबरोबरच पर्यटन उद्योगाचे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘त्रिसूत्री’ आखली आहे.
Ministry of Tourism
Ministry of TourismSakal

नवी दिल्ली - कोरोनामुळे (Corona) अनेक क्षेत्राबरोबरच पर्यटन उद्योगाचे (Tourism Business) मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने (Ministry of Tourism) ‘त्रिसूत्री’ (Plan) आखली आहे. यानुसार मेडिकल टुरिझम, ग्रामीण भाग आणि सेवा क्षेत्रावर भर देत रणनीती तयार केली आहे. तसेच परिषदा, बैठका आणि प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा आराखडा तयार केला आहे. (Compensation the Union Ministry of Tourism Plan)

भारतात ग्रामीण पर्यटनाला चालना देणाऱ्या राष्ट्रीय रणनीती आणि आराखड्यानुसार स्थानिक उत्पादनावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागात उत्पन्न आणि रोजगाराची संधी वाढविण्याबरोबरच स्थानिक गटांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर रोखणे, गरीबी दूर करणे आणि शाश्‍वत विकासासाठी हा आराखडा उपयुक्त ठरेल, असे म्हटले आहे. पर्यटनाच्या विकासासाठी तयार केलेला आराखडा हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरेल. या आधारे देशांतर्गत आणि स्थानिक पातळीवरचे पर्यटनाला प्रोत्साहित देण्याबरोबरच सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे.

Ministry of Tourism
वयोवृद्ध कैद्यांच्या सुटकेसाठी मेधा पाटकरांची सुप्रीम कोर्टात याचिका

वैद्यकीय आणि वेलनेस टूरिझमसाठी आखलेल्या आराखड्यानुसार भारतातील आरोग्य सेवा सक्षम करणे आणि आरोग्यावरचा खर्च कमी करणे यावर भर देण्यात आला आहे. भारतात जवळपास सर्वच प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. त्यात मानसोपचारतज्ञ, पर्यायी उपचार पद्धती आणि रुग्णसेवा यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा देशात आणि देशाबाहेर प्रसार करणे आणि यानुसार मेडिकल टूरिझमला चालना देणे याचे नियोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने आखलेल्या तिसऱ्या आराखड्यात एमआयसीई क्षेत्राचा एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास करणे याचे नियोजन केले आहे.एमआयसीई म्हणजे मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन याचे संक्षिप्त रुप आहे. सेवाक्षेत्राशी निगडित असणारे चार घटकांना पर्यटनाची जोड देण्यासाठी सक्रियतेने काम केले जात आहे. वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात या घटकांचा समावेश होतो आणि यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Ministry of Tourism
बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या, अशोक गेहलोतांची मागणी

तिन्ही आराखड्यावर मत मागवली

पर्यटन मंत्रालयाने म्हटले की, आरोग्य क्षेत्र आणि पर्यटन हे जगभरात सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. दोन्ही उद्योगांना एकत्र करत मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल (एमव्हीटी) ला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. गेल्या काही वर्षात भारत हा मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलमध्ये आघाडीच्या स्थानावर आहे. या ठिकाणी दर्जेदार आणि गुणवत्तेच्या निकषावर उतरणाऱ्या अनेक आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध आहेत. या आराखड्याच्या माध्यमातून केवळ अर्थव्यवस्थेलाच चालना मिळेल असे नाही तर उत्पन्न वाढीबरोबरच उत्पन्न निर्मितीचे साधनेही विकसित होणार आहेत. सेवाक्षेत्राशी निगडित रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती होईल. जसे की, हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट, कन्व्हेशन सर्व्हिस, वाहतूक, पर्यटन, मनोरंजन या घटकांना प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आहे. मंत्रालयाने या तिन्ही आरखड्यांवर ३० जूनपर्यंत नागरिकांकडून मत, सूचना मागवली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com