सुषमाजी, पंतप्रधानांनाही द्यायच्या समज; स्वराज यांना मोदींसह जेष्ठ नेत्यांकडून आदरांजली

सुषमाजी, पंतप्रधानांनाही द्यायच्या समज; स्वराज यांना मोदींसह जेष्ठ नेत्यांकडून आदरांजली

नवी दिल्ली : दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला "कोट प्रॅंट टाय' च्या प्रोटोकॉल विखळ्यातून बाहेर काढून पीपल्स कॉल म्हणजे लोकांचे मंत्रालय बनविले. विदेश मंत्रालयाची संस्कृतीच बदलणाऱ्या स्वराज या प्रसंगी जागतिक मंचांवरील भाषणाच्या पध्दतीबाबत मला म्हणजे पंतप्रधानांनाही स्पष्ट समज देत असत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांना आज आदरांजली वाहिली. 

6 ऑगस्टला, काश्‍मीरबाबतचे विधेयक संसदेत म्हणजे लोकसभेत मंजूर झाले त्यानंतर काही तासांतच 67 वर्षीय स्वराज यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या श्रध्दांजली सभेत मोदी यांनी स्वराज यांच्या नेतृत्वगुणाची व कार्यशैलीची मुकत कंठाने प्रशंसा केली. सभेपूर्वी अनुराधा पौडवाल यांनी काही भजने गायिली. सुषमा यांचे पती स्वराज कौशल व कन्या बासरी कौशल, भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजप मार्गदर्शक मरली मनोहर जोशी यांच्यासह केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (लोजपा), हरसिमरत कौर व सुखबीरसिंग बादल (अकाली दल), सतीश मिश्रा (बसपा), थिरूची सीवा(द्रमुक), नवनीत कृष्णन (अण्णाद्रमुक), आनंद शर्मा (कॉंग्रेस), अरविंद सावंत( शिवसेना) रामदास आठवले (आरपीआय),ज्येष्ठ नेते शरद यादव, जुना आखाडाचे महंत अवधेशानंद गिरी आदी उपस्थित होते.

जर्मनी, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क व अरब देशांसह अनेक देशांचे राजदूतही आले होते. मुसळधार पावसात हजारोंच्या संख्येने हजर असलेल्या व पक्षीय भेदांच्या पलीकडे जाऊन सुषमांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी जे एन आच्छादित मैदान गच्च भरले होते. माकप व डाव्यांनी मात्र आदरांजली सभेवर काट मारल्याचे चित्र होते. 
सुषमा स्वराज म्हणजे तेजाने लखलखणारी "भारताची मुक्ताबाई' होती अशी भावना अरविंद सावंत यांनी व्यक्त केली. शहा यांनी, सस्वराज या लोकांशी संपर्क व प्रेम कायम ठेवणाऱ्या असामान्य मंत्री होत्या असे सांगितले. 

स्वराज मतांच्या अतिशय पक्‍क्‍या होत्या असे सांगताना मोदी म्हणाले की यापूर्वीही एकदा त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा पक्षनेतृत्वाने त्यांनी बेळ्ळारीतून लढावे असा आदेश दिला होता. वेंकय्या नायडूंसह मी स्वतःच तो निरोप घेऊन त्यांना भेटलो होतो. त्यांचा निर्णय जाला होता. पण मतदारसंघ व प्रतिस्पर्दी उमेदवाराचे नाव ऐकताक्षणी त्या निवडणूक लढविण्यास तयार झाल्या. यंदाही मी त्यांना फक्त अर्ज भरा असे म्हटले होते. पण त्यांच्या प्रकृतीला ते मानवणार नव्हते व नंतर पुन्हा प्रेमळ दबाव येईल असे वाटून त्यांनी लोकसभा न लढविण्याची सार्वत्रीक घोषणाच करून टाकली. 

सुषमा या देशाला व आमच्या पक्षालाही फार मोठा वारसा देऊन गेल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात माझे पहिले बाषण होते तेव्हा मला वाटले मी उस्फूर्तपणे बोलेन. पण सुषमाजींनी ""नाही नाही, जागतिक मंचावर असे करता येत नाही,'' असे मला बजावून व रात्रभर जागून माझ्याकडून मुद्दे समजावून घेतले व रातोरात लिखीत भाषणही तयार केले. त्या मृदू होत्या, मायाळू होत्या, नम्र होत्या, लाघवी होत्या पम कधी चुकीचा निर्णय टाळण्यासाठी कठोर बोलताना त्यांच्या जिभेवर अस्सल हरियाणवी तिखट भाषाही येत असे असेही मोदी म्हणाले. 

मोदी म्हणाले की, कलम 370 रद्द केले पाहिजे ही भावना स्वराज यांनी संसदेत, संसदेच्या बाहेर हजारो वेळा व्यक्त केली असेल. हे कलम रद्द करण्याचे विधेयक मंजूर करून सरकारने काश्‍मीरबाबतची एतिहासिक चूक सुधारली तेव्हा जीवनातील इतके मोठे स्वप्न पूर्ण झाले तेव्ह ा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला व अतिशय प्रसन्नपणे त्या गेल्या असे बासुरीने मला सांगितले. बासुरीमध्ये मी त्यांचीच झलक पहातो असे सूचक विधानही पंतप्रधानांनी जाता जाता केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com